Contact For Any Help
Tel :- +91- 9892217281

You are Here:

About Ajit Raorane

आपण दिलेले शुभाशिर्वाद आणि स्नेह्पुर्वक प्रेम या दोन्हीच्या बळावर आज मी यशाचा शिखर पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. म्हणुनच मी गेल्या चार वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा आपल्या दृष्टिक्षेपास आणत आहे. आदरणीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशिर्वाद तसेच नामदार अजितदादा पवार, आर.

आर. पाटील साहेब, जयंत पाटील साहेब तसेच सचिनभाऊ अहिर यांनी केलेले प्रेमपुर्वक मार्गदर्शन याचेच हे सर्व फळश्रृत आहे.

आम्हांला आदरणीय साहेबांनी दिलेल्या कानमंत्राप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा कानमंत्र ध्यानी ठेवूनच विभागातील जनतेची अगदी जीवाभावाने सेवा करीत आलेलो आहे. विकासकामे तसेच जनतेची विविध प्रकारची कामे करीत असताना आपल्याकडे आलेली व्यक्ती कोणत्या पक्षाची असेल असे कधीही माझ्या मनात भासू दिले नाही कारण ती व्यक्ती काम करण्याचा हेतूने आपल्याकडे आलेली आहे तिची आदरपुर्वक सेवा करणे आपला धर्म मानला म्हणुनच तुम्हा सर्वाच्या आशिर्वादाने मुंबई महानगर पालिकेत पक्षाचा प्रथम प्रभाग समिती अध्यक्ष होण्याचा बहुमान माझ्या नशिबी येण्याचं भाग्याच म्हणांव लागेल....

विभागातील लोक प्रतिनिधी तसेच जनतेचा सेवक म्हणून माझ्या सर्व सहकार्र्याना बरोबर घेऊन जनतेची सेवा करीत असताना मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे ते करण्यासाठी मी सदैव तत्पर राहुन प्रभागात केलेली नागरी सुविधांची कामे त्यामध्ये मैदान, बगीचा, पदपथ, चौकांचे सुशोभिकरण, नवीन जलवाहिन्या टाकणे, छोटेमोटे रस्ते, पर्जन्यजलवाहिन्या व मलनी:सारण वाहिन्या, शाळा यांचे सुशोभिकरण तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रिडा क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा अहवाल हिंदुचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र जयंती निमित्ताने आपल्या समोर सादर करण्यास अत्यानंद होत आहे.